भविष्यात टीम ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीची धुरा सांभाळू शकतो बुमराह, पहा व्हीडिओ

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात नुकतीच कसोटी मालिका पार पडली. या मालिकेत भारताने 2-1 अशा फरकाने विजय मिळवत ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्य़ांदाच कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचला आहे.

या मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 21 विकेट्स घेत त्याच्या चांगल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. तो 2018 या वर्षात भारताचा सर्वाधिक विकेट घेणाराही गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे त्याचा चाहतावर्गही वाढला आहे.

याचाच प्रत्यय ऑस्ट्रेलियामध्ये आला आहे. ऑस्ट्रेलियामधील एक लहान मुलगा बुमराहप्रमाणेच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ज्या ट्विटर यूजरने या लहान मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे, त्याने ट्विटमध्ये म्हचले आहे की ‘ तूम्ही कसोटी मालिका जिंकण्याचा परिणाम एवढा झाला आहे की ऑस्ट्रेलियाच्या पुढील पिढीला तूम्ही प्रेरणा दिली आहे.’

या ट्विटला उत्तर देताना बुमराहने ट्विट केले आहे की ‘तो मुलगा खूप गोड आहे. त्याला माझ्या शुभेच्छा’

त्याचबरोबर त्या लहान मुलाने आयसीसीचेही लक्ष वेधून घेतले आहे. आयसीसीनेही या व्हिडिओवर ट्विट करताना म्हटले आहे की ‘ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील मालिका 2034 मध्ये चांगलीच रंगणार आहे.’

बुमराहला बीसीसीआयने 12 जानेवारीपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु होणाऱ्या वनडे मालिकेतून तसेच त्यानंतर होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यातील वनडे मालिकेतूनही विश्रांती दिली आहे. त्याच्या ऐवजी भारताच्या वनडे मालिकेत मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा मोठा अपघात

मुंबईकर शार्दुल ठाकूर या कारणामुळे आहे निराश

गिरे तो भी टांग उपर! ही काही सर्वोत्तम टीम इंडिया नाही, माजी खेळाडूची जोरदार टीका