दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा भारतीय वेगवान गोलंदाज आज करतोय पदार्पण

भारताचा यॉर्करकिंग जसप्रीत बुमराहसाठी हे नवीनवर्ष चांगलेच फायदेशीर ठरत आहे. कालच त्याला मुंबई इंडियन्सने संघात कायम केले आहे आणि आज त्याने कसोटीमध्ये भारताकडून पदार्पण केले आहे. त्याला कसोटी पदार्पणाची कॅप कर्णधार विराट कोहली कडून देण्यात आली.

याआधी बुमराहने २३ जानेवारी २०१६ ला वनडे सामन्यातून आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर बुमराहची कामगिरी चांगलीच राहिल्याने त्याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघातही निवड झाली.

आजपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. या मालिकेतील आज पहिला सामना दुपारी २ वाजता सुरु होणार आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघ: शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा, रिद्धिमान सहा, हार्दिक पंड्या, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.