बुमराहला खेळाताना पाहिलं की त्या महान गोलंदाजाची आठवण येते- डेनिस लीली

भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा कसोटी सामना गमावला असला तरी भारतीय गोलंदाजांनी यामध्ये उत्तम कामगिरी केली होती. यामध्ये जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचे कौतुक ऑस्ट्रेलियाचे दिग्गज गोलंदाज डेनिस लीली यांनी केले आहे.

लीली यांनी बुमराहची गोलंदाजी बघून ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज जेफ थॉमसन यांची आठवण येते असे म्हटले आहे.

“बुमराह जेव्हा गोलंदाजीला येतो तेव्हा तो कमी धावतो. मात्र त्याच्या खांद्यातून सरळ हाताच्या गोलंदाजीने तो बाकीच्या गोलंदाजांपेक्षा वेगळा आहे. त्याच्यामुळे मला त्या वेगवान गोलंदाजानी गाजवलेल्या काळाची आठवण येते तो म्हणजे जेफ थॉमसन”, असे लीली म्हणाले.

बुमराहने ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यात 11 विकेट्स घेतल्या आहेत.

“हे काही फक्त जलदगती गोलंदाजाबद्दल नाही तर भारतीय संघात अनेक उत्तम गोलंदाज आहेत. ज्याप्रकारे त्यांनी दोन कसोटी सामन्यात गोलंदाजी केली ते बघून मी आश्चर्यचकित झालो”, असेही लीली पुढे म्हणाले.

मेलबर्नची खेळपट्टी बघता भारताला तीन वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू घेऊन मैदानात उतरावे लागेल असेही लीली यांनी सुचविले आहे.

“भारताकडे आर अश्विन सारखा उत्तम फिरकीपटू आहे. ज्यामुळे त्यांना मेलबर्न कसोटीमध्ये चांगला खेळ करता येईल”, असे लीली म्हणाले.

जेफ थॉमसन यांनी ५१ कसोटी सामन्यात २८.६०च्या सरासरीने २०० विकेट्स घेतल्या होत्या. ते शेवटचा कसोटी सामना आॅगस्ट १९८५ मध्ये खेळले.

महत्त्वाच्या बातम्या:

तिसऱ्या पंचांनी दिले बाद, क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाने परत बोलवले फलंदाजीला

एकवेळ टीम इंडियाला धू-धू धूणारा फलंदाज घेतोय सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून संन्यास

जेव्हा हरमनप्रीत कौरचं घेते स्म्रीती मंधानाचा अप्रतिम झेल, पहा व्हिडीओ