बुमराहला तो अफलातून चेंडू टाकण्याचा सल्ला दिला या खेळाडूने

मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात 33 धावांत 6 विकेट्स घेतल्या. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावावंरच संपुष्टात आला. त्याच्या कारकिर्दीतील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

त्याने या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 33 व्या षटकातील शेवटचा चेंडू अफलातून टाकला. ज्याची चर्चा दिवसभर सुरु होती. या चेंडूवर त्याने ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शला पायचीत केले होते.

बुमराहने हा चेंडू स्लोअर यॉर्कर टाकला होता. ज्यावर मार्शला फटका मारता आला नाही. तो चेंडू डीपला जात मार्शच्या पॅजला लागला ज्यामुळे मार्श पायचीत बाद झाला. पण हा चेंडू टाकण्याचा सल्ला बुमराहला भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्माने दिला होता.

याबद्दल बुमराहनेच खूलासा केला आहे. बुमराह म्हणाला, ‘पहिल्या सत्राच्या आधी मी जेव्हा गोलंदाजी करत होतो तेव्हा खेळपट्टी फार मदत करत नव्हती. त्यामुळे मिडऑफला उभ्या असणाऱ्या रोहितने सांगितले की पहिल्या सत्राचा शेवटचाच चेंडू आहे तर तू स्लोअर बॉल टाकू शकतो. रोहित मला म्हणाला, वनडे आणि टी20 मध्ये अशा स्लोअर बॉलचा वापर केला जातो. मी त्याचा उपयोग केला आणि आम्हाला विकेट मिळाली.’

रोहित आणि बुमराह हे दोघेही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडूनही एकत्र खेळतात. त्यामुळे रोहितला बुमराहच्या गोलंदाजीबद्दल चांगली जाण आहे.

बुमराहने या सामन्यात पहिल्या डावात 6 विकेट्स घेतल्याने खास विक्रमही केला आहे. तो एकाच वर्षात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये कसोटीत एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा पहिला आशियाई गोलंदाज ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या बाबतीत असे तिसऱ्यांदाच घडले

बापरे! केवळ ८७ सेकंदात जडेजाने टाकले ६ चेंडू

जगातील सर्वच कर्णधारांसाठी हे वर्ष ठरले अतिशय खराब

रोहितचा नादच खुळा! या कारणामुळे आहे टीम इंडियासाठी लकी