कबड्डीपटू जसवीर सिंग अर्जुन पुरस्काराने सन्मानित !

0 60

स्कॉर्पियन किकसाठी पूर्ण कबड्डी जगात प्रसिद्ध असलेल्या जसवीर सिंगला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०१४च्या आशिया खेळामध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या संघात जसवीर होता. त्याच्या बरोबर २०१६च्या विश्वचषक विजेत्या संघातही तो होता.

प्रो कबड्डीच्या आगमनामुळे भारतात आता क्रिकेटनंतर कबड्डी हा सर्वात लोकप्रिय खेळ बनला आहे. प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमापासूनच जसवीर जयपूर पिंक पँथर्स या संघाकडून खेळत आहे. एवढेच नाही तर त्याने पहिल्या मोसमात जयपूरला स्वतःच्या नेतृत्वाखाली विजेतेपद ही जिंकून दिले होते. तर मागील मोसमात त्याने जयपूर पिंक पँथर्सला अंतिम सामान्यपर्यंत नेले होते.

जसवीर हा काही मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे जे प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमापासून एकाच संघाकडून खेळत आहेत. या वर्षी जसवीरने ३०० रेड गुण पूर्ण केले आहेत.

Comments
Loading...
%d bloggers like this: