भारताचा अष्टपैलू खेळाडू जयंत यादवला पितृशोक

भारताचा अष्टपैलू क्रिकेटर जयंत यादवच्या वडीलांनी आज दिल्लीच्या एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. किडनी आणि लीव्हरच्या आजाराने जयसिंह यादव हे बरेच दिवस आजारी होते.

त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा ही आम आदमी पार्टीचे माजी नेते आणि जयसिंह यांचे भाऊ योगेंद्र यादव यांनी दिली. जयसिंह यादव हे एक प्रथम श्रेणी क्रिकेटर होते.

जयंत यादवने १७ नोव्हेंबर २०१६ रोजी विशाखापट्टणम येथे कसोटी क्रिकेटमधून भारतीय संघात पदार्पण केले आहे. मुंबई कसोटीमध्ये इंग्लंड संघाविरुद्ध खेळताना त्याने शतकी खेळी केली होती.

जयंतने आतापर्यंत ४ कसोटी सामनेआणि १ एकदिवसीय सामना ही खेळ आहे. वानखेडे मैदानावर ९व्या क्रमांकावर भारताकडून फलंदाजी करताना त्याने जे शतक केले होते ते नवव्या क्रमांकावर एखाद्या खेळाडूने शतक करण्याची केवळ दुसरी वेळ होती.

सध्या संघाबाहेर असलेल्या यादवने ४ कसोटी सामन्यात ४५च्या सरासरीने २२८ धावा आणि ११ बळी घेतले आहेत.