आयपीएल २०१९ लिलाव: २०१८ला सर्वात महागड्या ठरलेल्या खेळाडूला यावर्षीही मिळाली तितकीच मोठी किंमत

जयपूर। 2019 चा आयपीएल लिलाव आज(18 डिसेंबर) जयपूरमध्ये सुरु आहे. यामध्ये सुरुवातीपासूनच धक्कादायक निर्णय पाहायला मिळाले आहेत.

आयपीएल लिलावात मागीलवर्षी सर्वात महागडा ठरलेला वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला यावर्षीही मोठी बोली लागली असून त्याला राजस्थान रॉयल्सने 8 कोटी 40 लाख रुपयांची बोली लावत संघात परत घेतले आहे.

उनाडकटला मागीलवर्षीही राजस्थानने 11.5 कोटीची बोली लावत संघात सामील करुन घेतले होते. पण त्यांनी यावर्षी त्याला लिलावासाठी मुक्त केले होते.

उनाडकट बरोबरच कार्लोस ब्रेथवेट, अक्षर पटेल या खेळाडूंना 5 कोटी किंमत मिळाली आहे. ब्रेथवेटवर कोलकता नाइट रायडर्स संघाने तर पटेलवर दिल्ली कॅपिटल्स संघाने बोली लावत संघात घेतले आहे.

तसेच युवराज सिंग, ब्रेंडन मॅक्यूलम, ख्रिस वोक्स या स्टार खेळाडूंवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाने बोली लावलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: इशांत शर्मासाठी ‘पार्ट-टाइम अंपायर’ झाला नॅथन लायन

ऑस्ट्रेलियन भूमीत टीम इंडियाविरुद्ध हा गोलंदाज ठरला सर्वात यशस्वी

Video: कोहली-पेन सोडा पण टीम इंडियाचेच हे दोन खेळाडू भिडले मैदानावर…