१७ वर्षीय मुंबईकर खेळाडूची झाली भारतीय संघात निवड

जेमिमा रोड्रिगेज या १७ वर्षीय मुंबईकर क्रिकेटपटूची आज भारतीय संघात निवड झाली आहे. बीसीसीआयने आज महिलांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वनडे संघाची निवड केली आहे. यात जेमिमा हिच्या नावाचाही समावेश आहे.

तिने मागील काही महिन्यात चांगली कामगिरी केली आहे. गेल्यावर्षी १९ वर्षांखालील मुंबई संघाकडून खेळताना तिने सौराष्ट्र विरुद्ध वनडे सामन्यात १६३ चेंडूत द्विशतक ठोकले होते. याच कामगिरीच्या जोरावर तिची नोव्हेंबर २०१७ मध्ये भारत अ संघात निवड झाली होती.

जेमिमा बरोबरच पूजा वस्त्रकार हिचीही पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतीय महिला संघ दक्षिण आफ्रिका दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाच्या वनडे आणि टी २० मालिका होणार आहेत. वनडे मालिका ५ फेब्रुवारीपासून सुरु होईल.

वनडे मालिकेसाठी मिताली राजकडेच कर्णधारपद कायम ठेवले आहे. तर हरमनप्रीतकडे उपकर्णधारपद असेल.

असा आहे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिलांचा संघ (वनडे)
मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), सुषमा वर्मा (यष्टीरक्षक), एकता बिस्त, स्म्रिती मानधना, पूनम राऊत, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, जेमिमा रॉड्रीगुएस, झुलन गोस्वामी, दीप्ती गोस्वामी, दीप्ती शर्मा, शिखा पांडे, मोना मेश्राम, पूजा वस्त्रकार, वेदा कृष्णामूर्थी, तानिया भाटिया (यष्टीरक्षक)

अशी असेल वनडे मालिका (भारतीय महिला संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे संघ)
५ फेब्रुवारी – पहिला वन-डे सामना, किंबेरली
७ फेब्रुवारी – दुसरा वन-डे सामना, किंबेरली
१०फेब्रुवारी – तिसरा वन-डे सामना, पॉटचेस्टरूम