भारताचे २०२० आॅलिंम्पिक स्पर्धेतील एक सुवर्णपदक पक्के! जाणुन घ्या का?

इंडोनेशियात सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये गुरुवारी भारताचा धावपटू जीन्सन जॉन्सनने 1500 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.

त्याने हे सुवर्णपदक 3 मिनिट 44.72 सेकंदाची वेळ नोंदवत मिळवले आहे. त्याची ही वेळ 2016 ला पार पडलेल्या रिओ आॅलिम्पिकमधील 1500 मीटर शर्यतीतील सुवर्णपदक विजेत्या मॅथ्यू सेंट्रोव्हित्झ जूनियरपेक्षाही कमी आहे.

सेंट्रोव्हित्झ जूनियरने रिओ आॅलिम्पिकमध्ये 1500 मीटर शर्यतीत 3 मिनिटे 50 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले होते.

तसेच जॉन्सनने गुरुवारी तब्बल 56 वर्षानंतर एशियन गेम्समध्ये भारताला या प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले आहे. याआधी 1962ला मोहिंदर सिंग यांनी सुवर्णपदक जिंकले होते.

त्याचबरोबर जॉन्सनने मंगळवारी 800मीटर शर्यतीतही रौप्यपदक जिंकले आहे. या शर्यतीत भारताच्याच मनजीत सिंगने सुवर्णपदक मिळवले आहे.

मनजीत 1500 मीटर शर्यतीतही सहभागी झाला होता. मात्र तो यात 3 मिनिटे 46.57 सेंकदाने चौथ्या स्थानावर राहिला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: भारताला सेलींग क्रिडा प्रकारात १ रौप्य आणि २ कांस्य पदके

असे आहेत युएफा चॅम्पियन्स लीगचे सर्व गट

एशियन गेम्स: भारताला महिलांच्या थाळीफेक तसेच 1500मीटर शर्यतीत कांस्यपदक

आशिया चषक स्पर्धेसाठी नेतृत्वाची धुरा रोहित शर्माकडे?