तिरंगी मालिकेचे सामने पाहता येणार या चॅनेलवर

उद्यापासून श्रीलंकेमध्ये ‘निदहास ट्रॉफी’ या तिरंगी टी20 मालिकेला सुरूवात होणार आहे. यामध्ये भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश यांचे सामने 6 मार्च ते 18 मार्च, 2018 दरम्यान होणार आहे.

या मालिकेच्या डिजीटल प्रसारणाचे हक्क जिओ टीव्ही लाईव्ह अॅपकडे आहे तर भारतातील डीएस स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्स व रिश्ते सिनेप्लेक्स हे टीव्ही चॅनेलसुद्धा लाईव्ह प्रसारण करणार आहेत.

या मालिकेचे समालोचन डी स्पोर्ट्सवर इंग्लिशमध्ये तर रिश्ते सिनेप्लेक्स हिंदीमध्ये होणार आहे. या ट्रॉफीचे सर्व सामने कोलंबोतील आर. प्रेमदासा या स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता होणार आहेत.

सिहंली भाषेत ‘निदहास ‘ या शब्दाचा अर्थ स्वातंत्र असा आहे. यावर्षी श्रीलंकेच्या स्वातंत्र्याला 70 वर्षे पूर्ण झाल्यामुळे ही मालिका होत आहे.

असे असेल निदाहास ट्रॉफी स्पर्धचे वेळापत्रक:

६ मार्च – श्रीलंका विरुद्ध भारत
८ मार्च -बांगलादेश विरुद्ध भारत
१० मार्च -श्रीलंका विरुद्ध बांगलादेश
१२ मार्च – भारत विरुद्ध श्रीलंका
१४ मार्च – भारत विरुद्ध बांगलादेश
१६ मार्च – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
१८ मार्च – अंतिम सामना