राष्ट्रकुल विक्रमासह जीतू रायचा सुवर्णवेध, भारताला ८वे सुवर्णपदक

राष्ट्रकुल स्पर्धेत आज पाचव्या दिवशी भारताला टेबलटेनीस पाठोपाठ आता शुटींगमध्येही सुवर्णपदक मिळवले आहे. जीतू रायने १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात हे सुवर्ण पदक मिळवून दिले. 

 जीतूने ही कामगिरी करताना २३५.१ गुण घेत राष्ट्रकुलमधील  १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात विक्रम केला आहे.  याच प्रकारात भारताच्या ओम मिथरवालला कांस्यपदक मिळाले. त्याने २१४.३ गुण घेत हे कांस्यपदक जिंकले.

जीतू रायने यापुर्वी २०१४मध्ये ग्लासगो राष्ट्रकूल स्पर्धेत ५० मीटर एअर पिस्तोल प्रकारात सुवर्ण वेध घेतला होता तर वर्ल्ड चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप आणि एशियन गेम्समध्ये या खेळाडूने आजपर्यंत भारताला अनेक पदके जिंकून दिली आहेत.