लॉर्ड्सवर होणाऱ्या दुसऱ्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे १२ जणांचा इंग्लंड संघ

14 ऑगस्टपासून लॉर्ड्स मैदानावर ऍशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडच्या निवड समितीने शुक्रवारी(9 ऑगस्ट) 12 जणांच्या इंग्लंड संघाची घोषणा केली आहे.

या सामन्यासाठी मोईन अलीला संघातून वगळण्यात आले आहे. त्याची मागील काही कसोटी सामन्यातील कामगिरी खास झालेली नाही. त्याच्याऐवजी सोमरसेट संघाचा डावकरी फिरकीपटू जॅक लीचला संघात संधी मिळाली आहे. त्याने आत्तापर्यंत 5 कसोटी सामने खेळले असून 20 विकेट्स घेतल्या आहेत.

त्याचबरोबर अपेक्षेप्रमाणे अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा पोटरीच्या दुखापतीमुळे आणि ऑली स्टोनचा पाठीच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही.

त्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी 12 जणांच्या संघात संधी मिळालेला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर या सामन्यातून कसोटी पदार्पण करण्याची दाट शक्यता आहे.

दुसऱ्या ऍशेस कसोटीसाठी असा आहे इंग्लंडचा 12 जणांचा संघ – 

जो रूट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जॉस बटलर, सॅम करन, जो डेन्ली, जॅक लीच, जेसन रॉय, बेन स्टोक्स, ख्रिस वॉक्स.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा आहे वेस्ट इंडीजचा संघ

१२ वर्षांपुर्वी अनिल कुंबळेने कसोटीत केला होता अजब कारनामा

स्वातंत्र्यदिनी एमएस धोनी करणार हे खास काम?