वर्ल्डकप २०१९मध्ये स्वत:च्या देशाऐवजी इंग्लंडकडून खेळणार हा खेळाडू

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू जोफ्रा आर्चरला 2019 मधे होणाऱ्या विश्वचषक आणि एॅशेश मालिकेसाठी इंग्लंड संघात समाविष्ठ करण्यासाठी त्याला ब्रिटनचे नागरिकत्व देण्यासाठी नियम शिथिल करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे वृत्त लंडनस्थित ‘द टाइम्स’  वृत्तपत्राने नुकतेच दिले आहे.

बार्बाडोसमधे जन्मलेल्या जोफ्रा आर्चरने वेस्टइंडीजच्या अंडर-19 संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2017 मधे बिग बॅश लिगमधील त्याच्या प्रदर्शनाने त्याने क्रिकेट विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.

याच कामगिरीमुळे आयपीएल 2018 साठी राजस्थान रॉयल्सने त्याला 7.20 कोटी रूपये मोजून त्याला करारबध्द केले आहे.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या नियमानुसार विदेशी खेळाडूला इंग्लंड संघाकडून खेळण्यास पात्र होण्यासाठी सलग सात वर्षांसाठी दरवर्षी 210 दिवस ब्रिटेनमधे निवास करणे गरजेचे आहे. या नियामाप्रमाणे आर्चर 2022 पर्यंत पात्र ठरत नाही.

आंतराष्ट्रीय क्रिकेट परीषदेच्या नियमाप्रमाणे एखाद्या खेळाडूला जर आपली जन्मभूमी सोडून दुसऱ्या संघाकडून खेळायचे असेल तर, ज्या देशाकडून त्याला खेळायचे आहे त्या देशात त्याने सलग चार वर्ष निवास करणे गरजेचं आहे.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळच्या बारा सदस्सीय समितीने या नियमात बदल करण्यास अनुमती दर्शवली आहे.

आयपीएल 2018 च्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 10 सामनन्यात 8.36 च्या सरासरीने 15 बळी मिळवत राजस्थानला प्ले-ऑफसाठी पात्र होण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली होती.

यापूर्वीही नासेर हूसेन, बॉब वूल्मर, केविन पीटरसन हे ब्रिटन बाहेर जन्मलेल्या खेळाडूनी इंग्लंड क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

सध्या इंग्लंड संघाचा महत्वाचा खेळाडू असलेला बेन स्टोक्सही न्यूझीलंडमधे जन्मला आहे.