जॉन डोमेन आणि नाओमी वॉन एस आहेत २०१६चे सर्वोत्कृष्ट हॉकी खेळाडू

0 108

हॉकीच्या इतिहासात प्रथमच आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघातर्फे पुरस्कार देण्यात आले. पुरुष गटात बेल्जियमचा कर्णधार आणि ऑलिम्पिक पदकविजेता जॉन डोमेन याला तर महिला गटात नेदरलँड्स संघाची नाओमी वॉन एस हिला २०१६चे सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित केले.

ब्रिटनची मॅडी हिच हिला महिला गटात सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले. पुरुष गटात हा पुरस्कार आयर्लंडचा डेव्हिड हर्टे याने पटकविला. बेल्जियमचा आर्थर वॉन डोरेन याला सर्वोत्कृष्ट प्रतिभावान खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. महिला गटात हा पुरस्कार अर्जेंटिनाची मारिया ग्रानाटो हिने जिंकला. सर्वोत्कृष्ट कोचचे दोन्ही गटांतील पुरस्कार ब्रिटन संघाला मिळाले. डॅनी केरी आणि कारेन ब्राऊन यांना हे पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट पुरुष पंच जर्मनीचे ख्रिस्टियन ब्लाश हे तर पहिला पंच म्हणून बेल्जियमच्या लॉरिन डेन फोर्ज पुरस्काराचे मानकरी ठरले. या सोहळ्यात भारताच्या एकाही खेळाडूला पुरस्कार मिळवता आला नाही.

भारताचा कर्णधार आणि गोलकीपर पी. आर. श्रीजेश हा गोलकीपरच्या तसेच हरमनप्रीतसिंग हा प्रतिभावान खेळाडूच्या शर्यतीत होता; पण दोघांनाही पुरस्कार जिंकण्यात अपयश आले. या प्रसंगी एफआयएच अध्यक्ष नरिंदर बत्रा म्हणाले,

‘‘जागतिक स्तरावर नैपुण्यप्राप्त पुरस्कारविजेत्या सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करतो. या पुरस्कारांमुळे भावी पिढीला प्रेरणा मिळत राहील.’’

Comments
Loading...
%d bloggers like this: