आणि केवळ ११ धावांनी हुकला आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम

कोलकाता | मंगळवारी झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान राॅयल्स सामन्यात कोलकाताने ६ विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात राजस्थान राॅयल्सच्या जोश बटलरने २२ चेंडूत ३९ धावांची खेळी केली.

त्याने या सामन्यात जर ११ धावा केल्या असत्या तर टी२०मध्ये सलग ६ अर्धशतके करणारा तो पहिला खेळाडू ठरला असता.

त्याने यापुर्वी ५ आयपीएलमध्ये ६७, ५१, ८२, नाबाद ९५ आणि नाबाद ९४ अशा धावा केल्या होत्या.

यापुर्वी सलग ५ टी२० सामन्यात अर्धशतक करण्याचा विक्रम हा विरेंद्र सेहवाग आणि त्याच्या नावावर होता.

२०१२मध्ये विरेंद्र सेहवागने दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळताना सलग ५ सामन्यात अर्धशतके केली होती.