मॅंचेस्टर युनायटेडचे मॅनेजर होसे मरिनोची पदावरुन गच्छंती

मॅंचेस्टर युनायटेडने मॅनेजर जोजे मरिनो यांना पदावरून काढण्यात आले आहे. या प्रीमियर लीगमध्ये त्यांच्या प्रशिक्षणाखाली क्लबची कामगिरी ढिसाळ झाल्याने त्यांना काढण्यात आले आहे.

28 वर्षानंतर प्रथमच हंगामाच्या सुरूवातीलाच पराभव स्विकारावा लागला आहे. तर रविवारी झालेल्या लीव्हरपूल विरुद्ध मॅंचेस्टर युनायटेडला 3-1 असा पराभूत व्हावे लागले.

जोजे मरिनो यांच्या जागी त्यांचे असिस्टंट मायकल कॅरीक यांची मॅनेजर पदावर नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

युनायटेडने ट्विटरवर जोजे मरिनो यांना त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मरिनो यांच्या प्रशिक्षणाखाली क्लबने 2016-17ची युरोपा लीग जिंकली आहे. तर एफए कपच्या अंतिम फेरीत ते पोहचले होते. यावर्षीच्या प्रीमियर लीगमध्ये 17 पैकी 7 सामने जिंकत युनायटेड सहाव्या स्थानावर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

कोहली-पेन वादाबद्दल बीसीसीआयने केला मोठा खुलासा

आयपीएल २०१९ लिलाव: २०१८ला सर्वात महागड्या ठरलेल्या खेळाडूला यावर्षीही मिळाली तितकीच मोठी किंमत

पाच चेंडूत पाच षटकारांची बरसात करणारा मुंबईकर झाला कोट्याधीश