दक्षिण आफ्रिकेच्या या मोठ्या खेळाडूने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जीन पॉल डुमिनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. तो यापुढे कसोटी क्रिकेटमध्ये भाग घेणार नाही.

डुमिनी आफ्रिकेकड़ून ४६ कसोटी सामने खेळला असून त्यात त्याने २१०३ धावा केल्या आहेत. त्यात ६ शतके आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची १६६ ही कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या असून ३२.८५ ही सरासरी राहिली आहे.

गोलंदाजीतही या खेळाडूने कमाल करताना ४२ बळी मिळवले आहे. इंग्लंडमधील कसोटी मालिकेत आफ्रिकेला ३-१ असे पराभवाला सामोरे जावे लागले होते. लॉर्ड कसोटीनंतर डुमिनीला संघातून वगळण्यात आले होते.