जस क्रिकेट अकादमी अ संघाची विजयी सलामी

पुणे, 22 मे 2017-  जस क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित जस क्रिकेट चॅम्पियन्स करंडक 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत जस क्रिकेट अकादमी अ संघाने ननावरे स्पोर्ट्स फाऊंडेशन संघाचा पराभव करत विजयी सलामी दिली.

पवार पब्लिक स्कुल येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत परम अभ्युदयच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरजस क्रिकेट अकादमी अ संघाने ननावरे स्पोर्ट्स फाऊंडेशन संघाचा 7 गडी राखून पराभव करत उघ्दाटनाचा दिवस गाजवला. पहिल्यांदा खेळताना ननावरे स्पोर्ट्स फाऊंडेशन संघाने 5 चेंडू बाकी असताना सर्वबाद 101 धावा केल्या. यात उदय थोरातने 14 धाव करून संघाच्या डावाला आकार दिला. जस क्रिकेट अकादमी अ संघाच्या आर्यन मन्हासने  2 गडी बाद केले. तर परम अभ्युदय, माहिर रावळ,हिमेश अगरवाल व तनिष बगाने यांनी प्रत्येकी 1 गडी बाद करत ननावरे स्पोर्ट्स फाऊंडेशन संघाला 19.1 षटकात सर्वबाद 101 धावांत रोखले. 101 धावांचे लक्ष जस क्रिकेट अकादमी अ संघाने परम अभ्युदयच्या 26 तर आर्यन मन्हासच्या 18 धावांच्या बळावर  20 षटकात 3 गडी गमावत 102 धावांसह पुर्ण केले. परम अभ्युदय सामनावीर ठरला.

स्पर्धेचे उद्घाटन पवार पब्लिक स्कुलच्या मुख्याध्यापिका पद्मावती जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवार पब्लिक स्कुलचे व्यवस्थापकीय संचालक मनिष कामत, एडमिन इनचार्ज उदय दळवी व जस क्रिकेट अकादमीचे संचालक व महाराष्ट्रचे रणजी खेळाडू पराग मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल– साखळी फेरी

ननावरे स्पोर्ट्स फाऊंडेशन– 19.1 षटकात सर्वबाद 101 धावा(उदय थोरात 14, दिशांक शहा 8, वंश मान 8, पार्थ मालपुरे 8, आर्यन मन्हास 2-15, परम अभ्युदय 1-19, माहिर रावळ 1-12, हिमेश अगरवाल 1-9, तनिष बगाने 1-9)पराभूत वि जस क्रिकेट अकादमी अ– 20 षटकात 3 बाद 102 धावा (परम अभ्युदय 26, आर्यन मन्हास 18, दिशांक शहा 1-19) सामनावीर– परम अभ्युदय

जस क्रिकेट अकादमी अ संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.