ज्वाला गुट्टाची बॅडमिंटनमधून निवृत्ती???

भारताची स्टार दुहेरी बॅडमिंटनमधील खेळाडू ज्वाला गुट्टा हिने बॅडमिंटनमधून निवृत्त झाल्याची बातमी परवा काही वृत्तपत्र आणि माध्यमांनी दाखवली. द्रोणाचार्य पारितोषिक विजेते प्रशिक्षक एस. एम. अरिफ यांनी ज्वाला बद्दल केलेल्या निवृत्तीच्या भाष्यामुळे ही बातमी आली.
अरिफ यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत अनेक मोठे खेळाडू निर्माण झाले आहेत. त्यात अगदी भारताचे बॅडमिंटन प्रशिक्षक गोपीचंद यांचाही समावेश आहे. पंतप्रधानांच्या ऑलिम्पिक फोर्स टास्क कॉन्फरेन्स समोर बोलताना अरिफ यांनी जवळच्या निवृत्तीबद्दलच वक्तव्य केलं होत.

काही वेळाने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना ज्वालाने ह्या वृत्ताच खंडन केलं आहे. ज्वाला म्हणाली, “मी सामने किंवा स्पर्धा खेळणं कमी केलं आहे. परंतु मी निवृत्ती घेतलेलं नाही. मी बॅडमिंटन खेळत राहणार आहे.”