मुंबई शहरची कुमार-किशोर गट निवड चाचणी आजपासून वडाळ्याला सुरू

दुर्गामाता (परेल) विरुद्ध जय स्वदेश (गिरगांव), वंदे मातरम् (नायगाव) विरुद्ध विजय बजरंग (प्रभादेवी) या किशोर गटाच्या सामन्याने मुंबई शहर कबड्डी असो.च्या कुमार व किशोर गट जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला आज दि. १८ मे २०१८रोजी प्रारंभ होईल.

वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिर येथे आज दुपारी ३-३०वा. मुंबई शहराचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, भारतीय क्रीडा मंदिरचे सरकार्यवाह संजय शेट्टे, प्राचार्य डॉ. जी. व्ही. पारगावकर, आजीवन अध्यक्ष मारुतीराव जाधव यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उदघाटन होईल.

या स्पर्धेतून मुंबई शहरचे कुमार-कुमारी, किशोर- किशोरी गटाचे संघ निवडण्यात येऊन ते राज्य निवड चाचणी स्पर्धेत मुंबई शहर संघाचे प्रतिनिधीत्व करतील.

या निवड चाचणी कबड्डी स्पर्धेकरिता ६ क्रीडांगणे तयार करण्यात आली असून, कुमार गटात १०६ संघ, कुमारी गटात १९संघ, किशोर गटात ७२संघ, किशोरी गटात १७ संघांनी सहभाग घेतला आहे.

सामने सकाळी ७-३० ते ११-०० आणि दुपारी ३-०० ते ६-३० या वेळात दोन्ही सत्रात खेळविण्यात येतील. याची नोंद या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांनी घ्यावी व सामन्यासाठी वेळेवर उपस्थित रहावे, तसेच सामनाधिकाऱ्यानी देखील वेळेवर उपस्थित राहून संघटनेला सहकार्य करावे असे आव्हान या पत्राद्वारे असो.चे सचिव विश्वास मोरे यांनी केले आहे.