पुणे लिग कबड्डी स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड चाचणी ८ जुलै रोजी

महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक संघटनेचे तसेच पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी संघटनेच्या मान्यतेने, बाणेर-बालेवाडी-पाषाण, प्रभाग क्र.९ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलनातील बॉक्सिंग हॉलमध्ये ही स्पर्धा दि. १९ ते २२ जुलै २०१८ या दरम्यान रंगणार आहे.

या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा कबड्डी संघटनेला संलग्न असणाऱ्या संस्थामधील पुरुष व महिला खेळाडूंची निवड चाचणी रविवार दि. ८ जुलै २०१८ रोजी सकाळी ९ ते १२ या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलनातील वेटलिफ्टिंग हॉल येथे होणार आहे.

या चाचणीस उपस्थित राहणाऱ्या खेळाडूंचा या स्पर्धेसाठी विचार केला जाणार आहे. यासाठी आत्माराम कदम, दत्ता कळमकर, किरण चांदेरे आणि सचिन शिंदे हे निवड समिती सदस्य म्हणून काम पाहणार आहेत, तर नियंत्रक म्हणून मधुकर नलावडे, शकुंतला खटावकर, बलराज वाडेकर, भाऊ करपे आणि दत्ता झिंजुर्डे यांची समिती असणार आहे.

मॅटवर होणारी ही स्पर्धा पुरुष तसेच महिला गटात होत आहे, अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

-ब्लाॅग- गिरीश, पुढील महिन्यात तुझ्या नावापुढे “आशियाई गेम्स गोल्ड मेडलिस्ट” लागावं

-भारताने पटकावले कबड्डी मास्टर्स स्पर्धेचं विजेतेपद, आंतरराष्ट्रीय कबड्डीत भारताचा दबदबा कायम

-विशेष मुलाखत- शिव छत्रपती पुरस्कार मिळाला की कबड्डी कारकीर्दीचं सार्थक झालं असं समजेन- गिरीश इरनक