कभी कभी लगता हैं कोहली ही भगवान हैं

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात शतकी खेळी केली.

या डावात 100 धावांच्या आतच भारताचा अर्धा संघ तंबुत परतलेला असताना विराटने भारताचा डाव संभाळत 225 चेंडूत 149 धावा केल्या आहेत. यात त्याने 22 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याचे हे इंग्लंडमधील कसोटीत पहिलेच शतक असुन एकूण 22 वे शतक आहे.

त्याने या डावात तळातल्या फलंदाजांना साथीला घेत भारताचा डाव सावरला होता. विराटने 9 व्या विकेटसाठी इशांत शर्मा बरोबर 35 धावांची तर 10 व्या विकेटसाठी उमेश यादवबरोबर 57 धावांची भागीदारी रचली. यामुळे भारताला पहिल्या डावात सर्वबाद 274 धावांचा टप्पा गाठण्यात यश मिळाले.

तसेच विराटने या सामन्यात कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावांचा टप्पाही पार केला आहे. यामुळे त्याचे सोशल मिडीयावर कौतुक झाले आहे. तसेच अनेक दिग्गजांनी त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.

ट्विटरवर एका चाहत्यांच्या एका ट्विटमध्ये विराटच्या फोटोबरोबर अशी कमेंट करण्यात आली आहे की ‘कभी कभी लगता है अपुन ही भगवान है’. असे एक वाक्य नुकत्याच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या सॅक्रिड गेम्स हा वेबसिरिज मधील असुन ते सध्या खुप लोकप्रिय झाले आहे. त्यात गणेश गायतोंडेचा रोल केलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीने हे वाक्य स्वत:साठी वापरले आहे.

या वाक्याची सध्या सोशल माध्यमांवर जोरदार चर्चा आहे. त्यात काल जेव्हा संपुर्ण संघ अपयशी ठरला तेव्हा विराटने फलंदाजी केली. त्यामुळे अनेक नेटीझन्सने हे वाक्य विराट कोहलीसाठी वापरले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जॉन्ग-उनची भारत-इंग्लंड सामन्याला हजेरी!

पहाटे ३ वाजता संपला सामना, खेळाडूने मैदानातच केली रडायला सुरूवात

विराट-अश्विन जोडी खास, आजपर्यंत इतिहासात अन्य कोणत्याही जोडीला हे जमले नाही