चौथ्या पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत साईराज क्षोत्री, नीव कोठारी, अनुज कदम, राजवीर पाडळे यांचे विजय

पुणे । पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील चौथ्या पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात साईराज क्षोत्री, नीव कोठारी, अनुज कदम, राजवीर पाडळे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

मेट्रोसिटी स्पोर्ट्स अँड हेल्थ क्लब, कोथरूड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात साईराज क्षोत्रीने यश अत्रेचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून दुसरी फेरी गाठली. नीव कोठारीने विहान पटनीला 6-1 असे पराभूत केले. अभिनित शर्माने वेदांत चव्हाणचा 6-2 असा सहज पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: 12 वर्षाखालील मुले:

साईराज क्षोत्री वि.वि.यश अत्रे 6-4;

नीव कोठारी वि.वि.विहान पटनी 6-1;

अभिनित शर्मा वि.वि.वेदांत चव्हाण 6-2;

अनुज कदम वि.वि.वेदांत माणकेश्वर 6-5(1);

राजवीर पाडळे वि.वि.मिहीर केळकर 6-0;

14 वर्षाखालील मुले:

देव तुराकिया वि.वि.पार्थ गुप्ता 6-3;

शारंग कसाळकर वि.वि.योगिता गायतोंडे 6-1;

प्रणव इंगोळे वि.वि.ऋषिकेश बर्वे 6-3;

अथर्व रतनोजी वि.वि.विश्वजित सणस6-2;

शौर्य राडे वि.वि.करण चहल 6-0;

तनिश बेळगलकर वि.वि.हर्षित गोळवलकर 6-3.