जेव्हा २२ वर्षीय खेळाडू होतो आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान

कागिसो रबडा आज जाहीर झालेल्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजीमध्ये अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. त्याने इंग्लडच्या जेम्स अँडरसन या दिग्गज गोलंदाजाला मागे टाकत हे स्थान पटकावले आहे.

कागिसोनेभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात ५ गुणांची कमाई केली. याचमुळे त्याच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे.

नोव्हेंबर २०१५ साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कागिसोने केवळ २ वर्षांतच ही कामगिरी केली आहे. गेल्यावर्षी हा खेळाडू वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला होता.

कागिसोने या सामन्यात ५ विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला ७२ धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

“ही मोठी गोष्ट आहे की तुम्ही आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होता. क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यावर एवढ्या लवकर अशी गोष्ट होणे आनंदायी आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि मी याचे श्रेय माझ्या संघाला देतो. ” असे कागिसो म्हणाला.

आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा कागिसो रबाडा हा केवळ ७वा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. यापूर्वी ऑब्रे फॉकनर, हँग टायफाइल्ड, पीटर पोलॉक, शॉन पोलॉक, डेल स्टेन आणि व्हर्नोन फिलँडर यांनी ही कामगिरी केली होती.