१२२ वर्षातील क्रिकेटमधील सर्वात मोठा इतिहास घडला आज

माजी कर्णधार एबी डी विलीयर्सची पहिल्या डावातील शतकी खेळी आणि वेगवान गोलंदाज कागीसो रबाडाची अफलातून गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला ६ विकेटने मात दिली. 

सध्या वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या परंतु जबरदस्त कामगिरी करत सामन्यात ११ विकेट घेणाऱ्या कागीसो रबाडाला सामनावीर घोषीत करण्यात आले. आॅस्ट्रेलियाला सर्वबाद करताना दक्षिण अाफ्रिकाकडून कागीसो रबाडाने २२ षटकांत ५४ धावा देत ६ विकेट घेतल्या. 

हे करताना त्याने एक खास विक्रम केला आहे. तो म्हणजे त्याने कारकिर्दीत प्रत्येक ३८.९व्या चेंडूवर विकेट घेतली आहे. त्याने आजपर्यंत कसोटीत ५२५४ चेंडू टाकले असून त्यात १३५ विकट्स घेतल्या आहेत. 

कसोटीत १०० पेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजात त्याचा विकेट घेण्याचा १२२ वर्षांतील हा सर्वोत्तम स्ट्राईक रेट आहे. 

१८९६ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या जाॅर्ज लोहमॅन यांनी प्रत्येक ३४.१ व्या चेंडूवर विकेट घेतली होती. आजही हा विक्रम त्यांच्या नावावर आहे.