वाढदिवस विशेष: फॅब-4 मधील केन विलियमसनबद्दल माहित नसलेल्या या 5 गोष्टी

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विलियमसनचा आज 28 वा वाढदिवस आहे. त्याने आतंरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला 2010 साली भारता विरुद्ध दमदार सुरवात केली होती.  आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात विलियम्सने 131 धावांची खेळी केली होती. आज 8 वर्षांनंतर केन विलियम्स क्रिकेट विश्वातील मोठे नाव बनले आहे.

जगात फॅब-4 म्हणून ओळखले जाणाऱ्या विराट कोहली, स्टीव स्मिथ, जो रुट यांच्याबरोबर केन विलियमसनचे नावही आदराने घेतले जाते.

आजपर्यंत न्यूझीलंड संघाकडून अनेक फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिेकेट गाजवले आहे. मात्र केन विलियमसन सारखे त्यांना फॅब-4 मध्ये स्थान मिळवता आले नव्हते.

केन विलियमसन बद्दलच्या खास गोष्टी-

– आजच्या अनेक यशस्वी क्रिकेटपटूंप्रमाणे विलियमसनेही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरमुळे क्रिकेट खेळायला सुरवात केली.

-क्रिकेट सोबतच केन विलियमसनला रग्बी आणि बॉस्केटबॉल हे खेळही तितकेच आवडतात. त्याने एका शालेय बास्केटबॉल स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कारही पटकावला आहे.

-केन विलियमसन, ट्रेंट बोल्ट आणि डग ब्रेसवेल हे न्यूझीलंड संघाकडून खेळणारे क्रिकेटपटू लहानपणी शेजारी राहत होते. हे तीघे आजही चांगले मित्र आहेत.

-केन विलियमसनला लोगन नावाचा जुळा भाऊ आहे. लोगनच्या जन्माआधी काही मिनिटे केन जन्मला आहे. या दोघांमध्ये कायम चांगले बॉन्डिंग राहिले आहे.

-केन विलियमसनचे संपूर्ण कुटूंब क्रीडाप्रेमी आहे. त्याच्या मोठ्या बहिणी व्हॉलीबॉलच्या उत्कृष्ट खेळाडू आहेत.

केन विलियमसनची आतंरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द-

केन  विलियमसनने 65 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 50.36 च्या सरासरीने 5338 धावा केल्या आहेत. यात 18 शतके आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे.

न्यूझीलंडकडून खेळलेल्या 127 एकदिवसीय सामन्यात विलियमसनने 46.88 च्या सरासरीने 5157 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 11 शतके आणि 33 अर्धशतके झळकावली आहेत.

केन  विलियमसनने 51 टी-20 सामन्यात 8 अर्धशतकाच्या सहाय्याने 1316 धावा केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-बेन स्टोक्सच्या त्या घटनेचा विडिओ या व्यक्तीने काढला होता

-पाकिस्तानी क्रिकेटपटू होणार मालामाल, नवीन करारानुसार किती रुपये मिळणार पहाच