व्हिडिओ: विलियम्सन म्हणतो, ‘…तर धोनीची न्यूझीलंडच्या संघात निवड करु’

मँचेस्टर। 2019 विश्वचषकात काल(10 जूलै) पहिला उपांत्य सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने 18 धावांनी विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला.

या सामन्यानंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीबद्दल बरीच चर्चा झाली. धोनीबद्दल न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनलाही प्रश्न विचारण्यात आला. विलियम्सनला ‘तू जर भारताचा कर्णधार असता तर धोनीला 11 जणांच्या संघात खेळवल असतं का’, असा प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर विलियम्सनने मजेशीर उत्तर देताना म्हटले आहे की जर धोनीने नागरिकत्व बदलले तर आम्ही त्याची निवड करु.

धोनीबद्दल बोलताना विलियम्सन म्हणाला, ‘धोनी न्यूझीलंडसाठी खेळण्यास पात्र नाही. पण तो जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. मी जर भारताचा कर्णधार असतो तर? हो, त्याचा (धोनी) या पातळीवरील अनुभव आणि या परिस्थितीत तो खूप महत्त्वाचा आहे.’

‘त्याचे आज आणि कालचे योगदान तसेच संपूर्ण स्पर्धेतील योगदान खूप खूप महत्त्वाचे आहे. त्याने या सामन्यात दोन्ही संघातील खेळांडूंपैकी चांगला खेळ केलल्या जडेजाबरोबर केलेली भागीदारी खूप मौल्यवान होती. तो सर्वोत्तम खेळाडू आहे. तो नागरिकत्व बदलणार आहे का? कारण आम्ही मग त्याच्या निवडीचा विचार करु.’

या सामन्यात भारतीय संघाने 240 धावांचा पाठलाग करताना 92 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर धोनी आणि रविंद्र जडेजाने सातव्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी करत चांगली लढत दिली होती. मात्र धोनी 50 धावा करुन धावबाद झाला तर जडेजा 77 धावा करुन झेलबाद झाला. त्यांनतर भारताचा डाव 49.3 षटकात सर्वबाद 221 धावांवर संपूष्टात आला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

एमएस धोनीने ७व्या क्रमांकावर फलंदाजीला येण्यामागील कोहलीने केले स्पष्ट कारण

भारताला पराभूत करत न्यूझीलंडने सलग दुसऱ्यांदा केला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश

…म्हणून सौरव गांगुलीने तो खेळाडू मैदानावर आल्यावर व्यक्त केले आश्चर्य