विलियम्सनने चालू सामन्यात चाहत्यांबरोबर असा साजरा केला वाढदिवस, पहा व्हिडिओ

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनचा काल(8 ऑगस्ट) 29 वा वाढदिवस होता. त्याने त्याचा हा वाढदिवस श्रीलंकेमध्ये चाहत्यांबरोबर साजरा केला आहे.

सध्या न्यूझीलंड संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील न्यूझीलंडचा तीन दिवसीय सराव सामना कालपासून सुरु झाला. न्यूझीलंडचा हा सराव सामना श्रीलंका बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन संघाविरुद्ध सुरु आहे. या सामन्यादरम्यान चाहत्यांनी विलियम्सनच्या वाढदिवसानिमित्त स्टेडीयममध्ये केक आणला होता.

विलियम्सननेही या चाहत्यांना निराश केले नाही. तो दोन षटकांच्या ब्रेकमध्ये या चाहत्यांकडे गेला आणि त्याने केकचा एक तुकडा खाल्ला आणि चाहत्यालाही केक भरवला.

या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो श्रीलंकेने ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच ट्विट केले आहे की ‘वाढदिवस साजरा करण्याची शानदार पद्धत. केन विलियम्सनने सराव सामन्यादरम्यान श्रीलंकेच्या चाहत्यांबरोबर केकचा एक तुकडा खात 29 वा वाढदिवस साजरा केला.’

न्यूझीलंड या श्रीलंका दौऱ्यात 2 कसोटी आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 2 सामन्यांची ही कसोटी मालिका कसोटी चॅम्पियनशीपचा भाग असेल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून युवराज सिंगच्या संघाने दिला बसमध्ये चढण्यास नकार

१९ वर्षीय ‘द्विशतकवीर’ शुबमन गिलने गंभीरच्या १७ वर्षांपूर्वीच्या विक्रमाला दिला धक्का

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम अमलाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा