‘कन्याकुमारी ते लेह-लडाख’ यशस्वी सायकल मोहिमेबद्दल प्रा. वासंती जोशी यांचा १२ ऑगस्ट रोजी सत्कार

'भारतीय विद्या भवन', 'इन्फोसिस फाऊंडेशन' तर्फे आयोजन

पुणे । ‘कन्याकुमारी ते लेह-लडाख ‘ यशस्वी सायकल मोहिमेबद्दल प्रा. वासंती जोशी यांचा १२ ऑगस्ट रोजी सायं 6 वाजता सत्कार पुण्यात करण्यात येणार आहे.

‘भारतीय विद्या भवन’, ‘इन्फोसिस फाऊंडेशन’ तर्फे या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली.

पुण्यातील एसएनडीटी महाविद्यालयातील प्रा. वासंती जोशी यांनी केवळ ३५ दिवसात कन्याकुमारी ते लेह-लडाख हे अंतर सायकल चालवत पूर्ण केले. ‘महिलांनी भीतीवर मात करावी, ‘कॉन्करिंग द फिअर ‘ ‘(conquering the fear) या संदेशाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम पूर्ण केला.

दिनांक २८ मे २०१८ वीर सावरकर जयंती दिनी या उपक्रमास सुरुवात होऊन महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या स्थापना दिनी ५ जुलै २०१८ रोजी या सायकल मोहिमेची सांगता झाली.

त्यांनी 4120 हजार किमी हे अंतर एकटीने पार केले असले तरी त्यांच्या या उपक्रमात केतकी जोशी, गायत्री फडणीस -परांजपे व गिरीकंद ट्रॅव्हल्स ‘च्या संचालिका शुभदा जोशी अशा तिघींची मोलाची साथ संपूर्ण मोहिमेत लाभली.

या अभूतपूर्व यशाबद्दल भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी सत्कार करण्यात येणार असून वासंती जोशी यांची मुलाखत व या मोहिमेचे दृक श्राव्य स्वरूपातील अनुभव कथन सादर केले जाणार आहे.

या कार्यक्रमास सर्व क्रीडा व सायकल प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन भवन चे संचालक प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी केले आहे.

येत्या रविवार दि 12 ऑगस्ट रोजी सायं 6 वाजता भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अंबाती रायडूसाठी भारताचा सलामीवीर उतरला मैदानात

ड्वेन ब्रावोचा मैदानाबाहेर पुन्हा एकदा धुमाकूळ