१९८३च्या कपिल देव आणि २०१७च्या हरमनप्रीत कौर यांच्या खेळीतील साम्य !

काल हरमनप्रीत कौरने १७१ धावांची धमाकेदार खेळी करून भारताला महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नेले. भारत रविवारी यजमान इंग्लंडबरोबर क्रिकेटचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर अंतिम सामना खेळणार आहे.

विश्वचषकाचा उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या सलामीच्या फलंदाजांचे लवकर बाद होणे आणि त्यानंतर मधल्या फळीतल्या एका फलंदाजाने आक्रमक आणि मोठी खेळी करून भारताला डोंगराएवढी धावसंख्या उभी करून देणे, हे सर्व या आधी कधी तरी घडलय असे नाही का वाटत?

होय हे याआधी ही घडले आहे फक्त ते महिला क्रिकेटमध्ये नव्हे तर पुरुष क्रिकेटमध्ये घडले आहे.

१९८३ला देखील भारत अश्याच काही संकटात सापडला होता ९ धावात भारताने ४ फलंदाज गमावले होते. तेव्हा भारताचा तेव्हाच कर्णधार कपिल देव मैदानात उतरला आणि १३८ चेंडूत १७५ धावा करून सामना भारताच्या दिशेने झुकवला. काल ही काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती जेव्हा भारताचा स्कोर ३५ वर २ बाद असा होता. पण त्यानंतर जी खेळी हरमनप्रीत कौरने केली ती कोणताही क्रिकेट प्रेमी कधीच विसरणार नाही. बिकट स्तिथीतून तिने संघाला फक्त बाहेरच नाही काढले तर धडाकेबाज फटके बाजी करून तिने संघाचा आणि स्वतःचा धावांचा डोंगरही उभारला.

तिची ही खेळी बघता कपिल देवच्या १९८३ च्या खेळीची आठवण होते. पाहुयात काय आहेत या दोन खेळीतील साम्य.

१. सलामीची फलंदाज दोनही सामन्यात कमी धावांत बाद.
२. दोनही फलंदाजांनी ही खेळी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत केली.
३. दोनही वेळा भारताचा विजय.
४. दोनही फलंदाज मधल्या फळीत फलंदाजी करणारे होते.
५. दोनही फलंदाजांनी १७० हुन अधिक धावा केल्या.
६. दोनही फलंदाजांचा स्ट्राईक रेट १२५ पेक्षा जास्त.
७. दोनही वेळेस भारताला ३० धावांहून अधिक धावांनी विजय.
८. दोनही वेळेस भारतीय संघाने २५० पेक्षा जास्त धावा केल्या.