तरच विराट कोहली करु शकतो इंग्लंडच्या भूमीत धावा…!

विराट कोहली हा जगातील कोणत्याही खेळपट्टीवर खेळू शकतो असे नेहमी म्हटले जाते. आणि विराटने हे सिद्धही केले आहे. असे असले तरी एक देश असा आहे ज्यात विराटला खरोखर चांगला खेळ करावा लागणार आहे आणि तो देश म्हणजे इंग्लंड. 

विराटने या देशात ५ कसोटी सामन्यात १० डावात फलंदाजी करताना १३.४० च्या सरासरीने १३४ धावा केल्या आहेत. 

भारतीय क्रिकेट संघ या वर्षी जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत ३ टी२० सामने, ३ वनडे सामने आणि ५ कसोटी सामने होणार आहेत.

या दौऱ्यात विराटला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. याबद्दल बोलताना माजी कर्णधार कपिल देव यांनी काही परखड मतं व्यक्त केली आहेत. 

” सराव खेळाडूला परिपुर्ण बनवतो. त्यामुळे तशा प्रकारच्या वातावरणात सराव करायलाच हवा.” असे कपिल देव म्हणाले. 

“तुम्ही लोकांसमोर एक दर्जेदार खेळाडू म्हणून तेव्हाच सिद्ध होता जेव्हा तुम्ही सर्व प्रकारच्या वातावरणात उत्तम क्रिकेट खेळू शकता. तेव्हाच तुम्ही सुनील गावसकर, व्हीव्हीयन रिचर्ड किंवा अॅलन बाॅर्डर सारखे खेळाडू बनू शकतात. ” 

“विराटच्या नावासमोर आजही इंग्लंडच्या भुमीत चांगली कामगिरी न केल्याचे प्रश्नचिन्ह आहे. जगातील एक अवघड दौरा म्हणून इंग्लंड देशाकडे पाहिले जाते. त्यामुळे विराटला य़ेथे धावा कराव्याच लागतील. “

“त्यासाठी त्याला इंग्लंडमध्ये एक किंवा दोन काऊंटी मोसम जर खेळला तर त्याचा त्याला नक्कीच फायदा होईल. ” असेही ते पुढे म्हणाले. 

-या दौऱ्यातील पहिला टी२० सामना ३ जुलै रोजी ओल्ड ट्रॅफिओर्ड येथे दुसरा सामना कार्डिफ येथे तर तिसरा सामना ब्रिस्टॉल येथे होणार आहे.

-वनडे मालिकेतील पहिला सामना १२ जुलै रोजी ट्रेंट ब्रिज, दुसरा कसोटी सामना १४ जुलै रोजी लॉर्ड्स येथे तर तिसरा सामना हेडींगले येथे होणार आहे.

– कसोटी मालिका १ ऑगस्ट रोजी सुरु होणार असून पहिला सामना एडगबास्टोन येथे, दुसरा सामना लॉर्ड्स येथे, तिसरा सामना ट्रेंट ब्रिज येथे, चौथा सामना अगेस बॉवेल तर शेवटचा सामना किया ओव्हल येथे होणार आहे.

-भारतीय संघ २०१४ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली येथील कसोटी मालिका १-३ अशी पराभूत झाला होता.

भारताच्या इंग्लंड मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
टी२० मालिका
३ जुलै । पहिली टी२० । ओल्ड ट्रॅफिओर्ड
६ जुलै । दुसरी टी२० । कार्डिफ
८ जुलै । तिसरी टी२० । ब्रिस्टॉल

वनडे मालिका
१२ जुलै । पहिली वनडे । ट्रेंट ब्रिज
१४ जुलै । दुसरी वनडे । लॉर्ड्स
१७ जुलै ।तिसरी वनडे । हेडींगले

कसोटी मालिका
१ ते ५ ऑगस्ट । पहिली कसोटी । एडगबास्टोन
९ ते १३ ऑगस्ट । दुसरी कसोटी लॉर्ड्स
१८ ते २२ ऑगस्ट । तिसरी कसोटी । ट्रेंट ब्रिज
३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर । चौथी कसोटी । अगेस बॉवेल
७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर । पाचवी कसोटी । किवा ओव्हल