कपिल देवचा ही मेणाचा पुतळा आता मादाम तुसाँमध्ये

भारताचा १९८३ मधील विश्वचषक विजेता कर्णधार आणि माजी अष्टपैलू खेळाडू कपिल देवचा मेणाचा पुतळा लवकरच प्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात बसविण्यात येणार आहे.

 

कपिलचा हा पुतळा मादाम तुसाँ संग्रहालयातील क्रीडा विभागात बसविण्यात येणार आहे. कपिलची गेल्याच आठवड्यात मादाम तुसाँच्या टीमने भेट घेऊन तब्बल ३०० वेगवेगळी मापे घेतली जेणेकरून पुतळा नीट बनवा.

 

कपिल म्हणाला, ” मादाम तुसाँच्या टीम बरोबर काम करताना मजा आली. मी आयुष्यभर क्रिकेट जगलो. मादाम तुसाँमध्ये पुतळा बसवणे हा सन्मान आहे. ”