चौथ्या पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत मेहक कपुर, श्रावणी देशमुख यांचा मानांकित खेळाडूंवर विजय

पुणे । पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील चौथ्या पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींच्या गटात मेहक कपुर याने तिस-या मानांकित सिध्दी खोतचा तर. 12 वर्षाखालील मुलींच्या गटात चौदाव्या मानांकीत श्रावणी देशमुख हीने चौथ्या मानांकीत रिषीता मोरेचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

मेट्रोसिटी स्पोर्ट्स अँड हेल्थ क्लब, कोथरूड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत 14 वर्षाखालील मुलींच्या गटात बिगर मानांकीत मेहक कपुरने तिस-या मानांकीत सिध्दी खोतचा 6-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अव्वल मानांकीत कौशिकी समंथाने दुर्गा बिराजदारचा 6-1 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

12 वर्षाखालील मुलींच्या गटाक दुस-या फेरीत चौदाव्या मानांकीत श्रावणी देशमुखने चौथ्या मानांकीत रिषीता मोरेचा 6-5(3) असा टायब्रेकमध्ये पराभव करत उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अव्वल मानांकीत काव्या देशमुखने केया तेलंगचा 6-0 असा सहज पराभव करत उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उप-उपांत्यपूर्व फेरी: 14वर्षाखालील मुली:
मेहक कपुर वि.वि सिध्दी खोत (3) 6-2;
कौशिकी समंथा(1) वि.वि.दुर्गा बिराजदार 6-1;
अलिना शेख वि.वि.सानिका लुकतुके 6-1;
श्रुती नानजकर(4) वि.वि.राजलक्ष्मी देसाई 6-2;
सिमरन छेत्री (8) वि.वि काव्या कृष्णन (6) 6-4;
मयुखी सेनगुप्ता (7) वि.वि अनिका शहा 6-1;
समृध्दी भोसले (5) वि.वि श्रावणी पत्की 6-4;

12 वर्षाखालील मुली- दुसरी फेरी
श्रावणी देशमुख (14) वि.वि रिषीता मोरे (4) 6-5(3);
काव्या देशमुख (1) वि.वि केया तेलंग 6-0;
अनन्या देशमुख वि.वि काव्या पत्की 6-1;
अविपशा देहुरी वि.वि प्राची एस 6-5(5);
प्रेक्षा प्रांजल(8) वि.वि अनुवा कौर 6-0.