आकाश अंबानीच्या लग्नात हार्दिक पंड्या-करण जोहरने धरला ठेका

शनिवारी मुकेश अंबानींचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांना विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी क्रिकेटपटू, सिनेकलाकार, व्यावसायिक अशा अनेक क्षेत्रातील सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. या लग्नसोहळ्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

यातील एक व्हिडिओ भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि करण जोहर यांच्या डान्सचाही आहे. या व्हिडिओमध्ये करण आणि हार्दिकने पहिल्यांदा एकमेकांना मिठी मारलेली दिसते आणि मग हे दोघे डान्स करताना दिसले आहेत. त्यांनी यावेळी ‘दिल्लीवाली गर्लफ्रेंड’ या गाण्यावर डान्स केला आहे.

काही दिवसांपूर्वी करण जोहर अँकर असलेल्या ‘कॉफी विथ करन’ या शोमुळे हार्दिकसमोर मोठी समस्या उभी राहिली होती. या शोमध्ये हार्दिक आणि केएल राहुल सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी बोलताना महिलांबद्दल काही विवादात्मक विधाने केली होती.

ज्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका झाली. तसेच त्यांना ऑस्ट्रेलिया दौराही अर्ध्यावर सोडून भारतात परतावे लागले होते आणि बीसीसीआयच्या तात्काळ बंदीला सामोरे जावे लागले होते. पण ही बंदी काही दिवसांनी बीसीसीआयने उठवली.

या प्रकरणाबद्दल हार्दिक आणि राहुल यांनीही माफी मागितली होती. तसेच करणनेही या प्रकरणाचा पश्चाताप झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे हार्दिक आणि करणमधील नात्यात दुरावा आल्याचे बोलले जात होते, पण त्यांनी आकाश अंबानीच्या या लग्नात एकत्र डान्स करत या शंका दूर केल्या आहेत आणि त्यांच्यातील नाते चांगले असल्याचे दाखवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

एवढी चांगली खेळी केलेल्या त्या खेळाडूचे नावच विसरला शिखर धवन

हत्येपेक्षाही मोठा गुन्हा आहे मॅच फिक्सिंग- एमएस धोनी

कारकिर्दीतील पहिलाच षटकार मारणाऱ्या बुमराहचा हा अनोखा कारनामा…