कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

सरहद यांच्या तर्फे आणि सिस्का ग्रुप ऑफ कंपनीज पुरस्कृत कारगिल येथे कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि शर्यत कारगिल येथे 1 व 2सप्टेंबर रोजी रंगणार आहे.

कारगिल येथे होणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेला सिस्का लेड यांचा पाठिंबा लाभला आहे. या स्पर्धेच्या लोगोचे अनावरण सिस्का ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक राजेश उत्तमचंदानी, रनबडीज क्लबचे अरविंद बिजवे आणि संजीव शहा यांच्या हस्ते करण्यात आले.

रनबडीज क्लबचे अरविंद बिजवे म्हणाले कि, कारगिल येथे झालेल्या भारत व पाकिस्तान यांच्यातील युद्धाची आठवण आपण सर्वांनाच आहे. या युद्धात आपल्या जवांनी मिळविलेल्या विजयाची आठवण म्हणून कारगिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते.

कारगिल परिसरातील वातावरण अधिकाधिक संव्हाराचे आणि शांततेचे राहावे. तसेच, परस्पर सामंजस्य वाढावे आणि पर्यटकांच्या संख्येत वाढ व्हावी हा सुद्धा या मॅरेथॉन आयोजनामागील उद्देश आहे.

अखेर कोणत्याही परिसारमधील कला व क्रीडा उपक्रमाचे आयोजन हे तेथील जनजीवन सुरळीत असल्याचे लक्ष असते. त्यामुळे हि मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधितांचा प्रयत्न असतो. तसेच या मॅरेथॉनला नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो.

सिस्का ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक राजेश उत्तमचंदानी म्हणाले कि, कारगिल आंतरतराष्ट्रीय मॅरेथॉन हि शर्यत अस्सल धावपटूंसाठी खास आकर्षण ठरणार आहे. तसेच, ज्यांचे धावण्यावर अतिशय प्रेम आहे, अशा हौशी धावपटूंसाठी हि शर्यत विशेष आकर्षण ठरणार आहे.

तसेच, हि स्पर्धा दोन दिवस चालणार असून यामध्ये 1सप्टेंबर रोजी होणाऱ्या टायगर हिल चॅलेंज या स्पर्धेत 60किलोमीटर, 120किलोमीटर, 160किलोमीटर रन अशा तीन प्रकारांचा समावेश आहे.

तर, 2सप्टेंबर रोजी होणाऱ्या कारगिल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 42किलोमीटर, 21किलोमीटर, 10किलोमीटर व 5 किलोमीटर रन या प्रकारांचा समावेश आहे. स्पर्धेत पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नई, वाराणसी, सिलिगुडी, पश्चिम बंगाल, सिक्कीम यांसारख्या शहरातून 2000हुन अधिक स्पर्धक आपला सहभाग नोंदवितात.

स्पर्धेतील विजेत्यांना मानचिन्ह व आकर्षक भेटवस्तू पारितोषिके देण्यात येणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कुठे गेला तुमचा कोहली?

-दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघातून स्टार खेळाडूला वगळले

-श्रीलंकन युवा संघ पुन्हा एकदा पडला टीम इंडियाला भारी