सलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू

मुंबई | रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात चेन्नईने हैद्राबादवर ८ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबर चेन्नईने आयपीएलमध्ये सर्वाधिक विजेतेपदं मिळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या ३ विजेतेपदांची बरोबरी केली आहे.

या सामन्यात हरभजन सिंग सारख्या अनुभवी खेळाडूच्या जागी कर्ण शर्मा या खेळाडूला संधी दिली. वानखेडेवर असलेला हरभजनचा मोठा अनुवभ माहित असुनही धोनीने कर्णला संधी दिली.

या सामन्यात त्याने ३ षटकांत २५ धावा देत १ विकेट घेतली आणि ती विकेट होती या संपुर्ण स्पर्धेत ७०० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या कर्ण शर्माची.

३० वर्षीय कर्ण शर्मा आयपीएलमध्ये २००९ पासुन खेळत आहे. त्यात तो बेंगलोर, हैद्राबाद, चेन्नई आणि मुंबई संघांचा भाग राहिला आहे.

२०१६मध्ये तो सनरायझर्स हैद्राबादमध्ये खेळत होता. त्याला अंतिम सामन्यात संधी देण्यात आली नाही. त्याला त्या स्पर्धेत ५ सामन्यात एकही विकेट घेता आली नव्हती. त्यानंतर पुढच्या वर्षी त्याला मुंबई इंडियन्सने संघात घेतले.

२०१७मध्ये मुंबईकडून खेळताना त्याला अंतिम सामन्यात स्थान देण्यात आले होते. या सामन्यात त्याने चांगली गोलंदाजी करताना ४ षटकांत केवळ १८ धावा दिल्या. याच सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने केवळ १२९ धावा केल्या होत्या. त्यामुळे कर्णच्या गोलंदाजीत दिलेल्या कमी धावाही महत्त्वाच्या ठरल्या.

कालच्या सामन्यात तो त्या संघाविरुद्ध खेळत होता ज्यांच्याकडून तो २०१६मध्ये विजेतेपद जिंकला होता तर त्या संघाच्या मैदानावर खेळत होता ज्या संघाकडून तो २०१७मध्ये विजेतेपद जिंकला होता.

कर्ण शर्माची आयपीएल विजेत्या संघाकडून कामगिरी-

२०१६- सनरायझर्स हैद्राबाद- ५ सामन्यात ० विकेट

२०१७- मुंबई इंडियन्स- ९ सामन्यात १३ विकेट

२०१८- चेन्नई सुपरकिंग्ज- ६ सामन्यात ४ विकेट

महत्त्वाच्या बातम्या-

म्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन

जेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप झाली पक्की

-सचिनलाही न जमलेला विक्रम केन विलियमसने करुन दाखवला

लाॅर्ड्स कसोटी पाकिस्तानने जिंकली, इंग्लंडविरुद्ध मालिकेत १-० आघाडी

आयपीएल विजेते होणार मालामाल, मिळणार मोठे बक्षीस