देशांतर्गत क्रिकेटमधील ‘वाघ’ मयांक अग्रवालने २००३ विश्वचषकातील सचिनचा विक्रम मोडला

दिल्ली |आज कर्नाटक विरुद्ध सौराष्ट्र यांच्यामध्ये विजय हजारे ट्रॉफी २०१८ च्या अंतिम लढतीत मयांक अग्रवालने ७९ चेंडूत ९० धावांची खेळी केली. करूण नायर आणि केएल राहूल हे दोन्ही खेळाडू ० धावेवर बाद झाल्यावर अग्रवालने चांगली खेळी करत कर्नाटकला चांगली सुरूवात करून दिली. 

तो ९० धावांवर बाद झाला तेव्हा त्याच्या नावावर एक खास विक्रम नोंदवला गेला. त्याने ८ सामन्यात ८ डावात ९०.३७च्या सरासरीने ७२३ धावा केल्या आहेत. त्यात ३ शतकी तर ४ अर्धशतकी खेळी केल्या आहेत. 

भारतीय खेळाडूने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये (लिस्ट अ) प्रथमच ७०० धावा केल्या आहेत. आजपर्यंत कोणत्याही खेळाडूला कारणामा करता आलेला नाही. 

यापुर्वी २००३ विश्नचषकात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावावर होता. सचिनने ११ सामन्यात ६१.१८ च्या सरासरीने ६७३ धावा केल्या होत्या. त्यात सचिनने १ शतकी तर ६ अर्धशतकी खेळी केल्या होत्या. 

मयांक अग्रवालने भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत मोसमात २००० धावांचा टप्पा पार केला आहे. त्याने २५ सामन्यात २१४१ धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. 

मय़ांकने २०१७-१८ रणजी मोसमात कर्नाटक संघाकडून खेळाताना ८ सामन्यात १३ डावात फलंदाजी करताना १०५.४५ सरासरीने ११६० धावा केल्या. विशेष म्हणजे त्याने २७ दिवसांत १००३ धावा केल्या होत्या. तर सईद अली मुश्ताक ट्राॅफीमध्ये त्याने ९ सामन्यात २८.६६ च्या सरासरीने २५८ धावा करत कर्नाटककडून दुसऱ्या क्रमांकाची चांगली कामगिरी केली आहे.