सलवार कमीज घालून तिने लढली डब्लूडब्लूइ फाइट !

द ग्रेट खली आणि जिंदर महल यांनतर केवळ तिसरी भारतीय तर पहिली भारतीय महिला कुस्तीपटू कविता देवीने डब्लूडब्लूइ विश्वात पाऊल ठेवले आहे. तिने ऑगस्ट महिन्यात झालेल्या या स्पर्धेत कविता देवीने भगव्या सलवार कमीजमध्ये आणि कंबरेला दुपट्टा घालून न्युझीलँडच्या डाकोटा काईशी माये यंग क्लासिक स्पर्धेत भाग घेतला होता.

यापूर्वी द ग्रेट खलीने WWE ने जगातील कुस्तीपटूंमध्ये छाप सोडली होती. रॅडी ऑरटनला पराभूत करून जिंदर महलने WWE चॅम्पिअनशिप जिंकली होती. कॅनडाच राष्ट्रीयत्व घेतलेला महल खली नंतर केवळ दुसरा भारतीय होता जो कुस्तीच्या या महासंग्राम उतरला होता. तिसऱ्या भारतीय खेळाडूंच्या रूपाने कविता देवीने आता या विश्वात पाऊल ठेवले आहे.

WWE च्या अधिकृत युट्यूब चॅनेलवरून ३१ ऑगस्ट रोजी हा विडिओ शेअर करण्यात आला असून त्याला तब्बल ३ मिलियन लोकांनी पहिले आहे. कविता देवीला हा सामना जिंकता आला नाही परंतु तिने चाहत्यांची मने मात्र जिंकली आहे.