केदार जाधव आणि आंबाती रायडूचा भारताच्या संघात समावेश

23 आॅगस्टपासून सुरु झालेल्या चौरंगी मालिकेसाठी भारताचे खेळाडू अंबाती रायडू आणि केदार जाधव यांची अनुक्रमे भारत अ आणि भारत ब संघात निवड झाली आहे.

ही मालिका भारत अ, भारत ब, आॅस्ट्रेलिया अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघात होणार आहे. तसेच ही मालिका 17 आॅगस्टपासून सुरु होणार होती. यातील पहिले चारही सामने विजयवाडा येथे होणार होते.

परंतू विजयवाडा येथे जोरदार पावसाची शक्यता असल्याने तेथील सामने बंगळूरू आणि अलूर येथे हालवण्यात आले असून 23 आॅगस्टपासून या मालिकेला सुरुवात झाली आहे.

या मालिकेसाठी नुकतीच योयो फिटनेस टेस्ट यशस्वी पार केलेले केदार जाधव आणि अंबाती रायडूलाही संधी देण्यात आली आहे.

याबद्दल बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की “23 आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या चौरंगी मालिकेसाठी भारत अ आणि भारत ब संघात दोन बदल करण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी अंबाती रायडू आणि केदार जाधव अनुक्रमे भारत अ आणि भारत ब संघात सामील होतील.”

तसेच सिद्धेश लाड आणि रिकी भूईला त्यांच्या भारत अ आणि भारत ब संघातून दुलीप ट्रॉफी खेळण्यासाठी मुक्त करण्यात आले आहे. सिद्धेश आणि रिकी सध्या सुरु असलेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये अनुक्रमे त्यांच्या इंडिया रेड आणि इंडिया ब्ल्यू संघाकडून खेळतील.

केदार जवळ जवळ 4 महिन्यांनी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. त्याला आयपीएल दरम्यान हॅमस्ट्रींगची दुखापत झाल्याने जूनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

तर रायडूला योयो टेस्ट अपयशी झाल्याने भारतीय संघातील स्थान गमवावे लागले होते परंतू आता त्याने योयो टेस्ट यशस्वी पार केली आहे.

त्याचबरोबर या चौरंगी मालिकेसाठी भारत अ संघात पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी यांची आधीच निवड झाली होती.

परंतू इंग्लंड विरुद्ध भारताचा वरिष्ठ संघ यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील उर्वरित चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी शॉ आणि विहारी यांची भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे त्यांनाही या चौरंगी मालिकेतून मुक्त करण्यात आले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: 28 वर्षांनंतर इराण कबड्डी संघाने जिंकले सुवर्णपदक

एशियन गेम्स: रोइंगमध्ये भारताला एक सुवर्णपदक तर 2 कांस्यपदक

एशियन गेम्स: भारताला कबड्डीत पराभूत करत इराणच्या महिलांनी रचला इतिहास