दादा…तू पिचवर बसूनच गोलंदाजी कर ना!

डर्बन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ६ विकेट्सने विजय मिळवला. यात कर्णधार कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी चमकदार कामगिरी केली तर गोलंदाजीत युझवेन्द्र चहल आणि कुलदीप यादवने मिळून ५ विकेट्स घेतल्या.

परंतु या सामन्यानंतर आज सोशल मीडियावर केदार जाधवला जोरदार ट्रोल केलं जात आहे. त्याच कारण म्हणजे केदार काल वेगळ्याच प्रकारे केलेली गोलंदाजी आणि त्यानंतर आज ट्विटरवर केलेली पोस्ट.

त्याच्या या फोटोवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. यातील बहुतेक प्रतिक्रिया ह्या नकारात्मक आहेत.

तू राऊंड द विकेटवरूनही ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. हे असलं टॅलेंट कुठून शिकला आहेस? जर असाच खेळत राहिला तर तू पीचवर बसूनही गोलदांजी करू शकतोस. अशी एक प्रतिक्रिया चाहत्याने दिली आहे.

अरे भाई जब इतने नीचे से ही बॉल करनी होती है तो रनअप क्यों लेते हो? नीचे पिच पर आराम से बैठकर ही बॉल कर लिया करो। अशी एकी प्रतिक्रिया ह्या ट्विटवर आली आहे.

तत्पूर्वी केदारला कालच्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही आणि गोलंदाजीत त्याला ३ षटकांत विशेष चमक दाखवता आली नाही.