नवीन मोसमात केदार जाधवकडे कर्णधारपद

पुणे । सईद मुश्‍ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाचं कर्णधारपद भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवकडे देण्यात आले आहे. केदार भारतीय कसोटी संघाचा भाग नसल्या कारणाने या स्पर्धेत खेळणार आहे.

ही स्पर्धा आजपासून सुरु झाली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या उपकर्णधारपदी या वर्षी आयपीएलमध्ये तसेच रणजी स्पर्धेत महाराष्ट्राकडून चांगली कामगिरी करणाऱ्या राहुल त्रिपाठीची निवड झाली आहे.

७ ते १३ जानेवारी दरम्यान हे सामने राजकोट येथे होणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्र पश्चिम विभागातील गुजरात संघाशी ७ जानेवारी म्हणजे आज, सौराष्ट्र संघाशी उद्या, ११ जानेवारी रोजी मुंबईविरुद्ध तर १३जानेवारी रोजी बडोदा संघाशी दोन हात करणार आहे.

सईद मुश्‍ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी असा असेल महाराष्ट्राचा संघ – केदार जाधव (कर्णधार), राहुल त्रिपाठी (उपकर्णधार), अंकित बावणे, स्वप्निल गुगळे, विजय झोल, ऋतुराज गायकवाड, नौशाद शेख, निखिल नाईल (यष्टिरक्षक), प्रयाग भाटी, दिव्यांग हिंगणेकर, शमशुझमा काझी, डॉमिनिक मुथ्थुस्वामी, सत्यजित बच्छाव, जगदीश झोपे, श्रीकांत मुंढे, समद फल्ला.