एशिया कप गाजविलेल्या अष्टपैलू केदार जाधवला मोठा धक्का

29 सप्टेंबरला झालेल्या एशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशावर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता. भारताच्या या विजयात महत्वाची भुमिका  केदार जाधवने निभावली होती.

पहिल्यांदा त्याने गोलंदाजी करताना त्याने 9 षटकात 41 धावा देत 2 बळी मिळवले. त्यानंतर केदारने 27 चेंडूत 23 धावांची नाबाद खेळी करत भारताला ऐतिहासिक 7 व्यांदा विजतेपद मिळवून दिले.

सामन्या दरम्यान  फलंदाजी करताना केदारच्या पायाचे स्नायू दुखावल्यामुळे त्याला मैदान सोडून जावे लागले होते. ही दुखापत गंभीर स्वरूपाची असून त्याला त्यातून सावरण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्या आधी देखील मांसपेशी दुखवल्यामुळे केदार बरेच दिवस संघातून बाहेर राहिला होता.

आयपीएलच्या आपल्या पहिल्याच सामन्यात त्याला मांसपेशी दुखवल्याचा त्रास झाला होता. त्यानंतर तो इंग्लड आणि आर्यंलंड दौऱ्यातून संघाबाहेर होता.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “केदारच्या उजव्या पायाला ही दुखापत झाली आहे. मागच्या वेळी त्याच्या डाव्या पायाला त्रास झाला होता. त्याच्या पायाचे स्कॅन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या विषयी माहिती दिली जाईल.”

महत्वाच्या बातम्या-

विराट कोहलीला अझरुद्दीनचा हा विक्रम मोडण्याची संधी

करुण नायरला संघात संधी न दिल्याने हरभजन सिंगची निवड समितीवर कठोर शब्दात टिका

माजी कर्णधार एमएस धोनीबरोबर घडला विलक्षण योगायोग