पुन्हा अपयश येऊ नये म्हणून विराट आधीच पकडणार इंग्लंडचे विमान!

मुंबई | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली इंग्लड दौरा सुरू होण्यापूर्वीच या देशात जाणार आहे. विराट या देशात काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची शक्यता आहे. 

विराट या देशात गेल्या दौऱ्यात मोठ्या प्रमाणावर अपयशी ठरला होता. त्याला कसोटी सामन्यात १० डावात जेमतेम १३४ धावा करता आल्या होत्या. यामुळे तो देशात मोठ्या प्रमाणात अपयशी ठरतो अशी टिका होत असते. 

याचमूळे कोहलीने हा दौरा खूपच मनावर घेतला आहे.

“काउंटी क्रिकेटमध्ये खेळल्यामुळे माझा खेळ नक्की सुधारेल. यामुळे मला आव्हानांचा सामना करायला मिळून स्पर्धांत्मक क्रिकेट खेळायला मिळेल.एवढ सगळं मिळूनही तुम्हाला येथे यश मिळेल याची कुणीही खात्री देऊ शकत नाही.” असे विराट एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाला. 

“या देशात आधी जाऊन तुम्ही इथल्या वातावरणाशी जूळवून घेऊ शकता. त्यामूळे तुम्हाला जास्त संधी मिळू शकतात. ” असेही विराट म्हणाला. 

महत्वाच्या बातम्या-

स्मिथ आणि विराट होणार टीममेट, खेळणार या संघाकडून !