फिनआयक्यू करंडक एमएसएलटीए राज्य मानांकन 10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत नील केळकर, अयान शेट्टी, रित्सा कोंडकर यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे, दि.9 एप्रिल  2019:  नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या फिनआयक्यू करंडक एमएसएलटीए राज्य मानांकन 10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात नील केळकर, अयान शेट्टी यांनी, तर मुलींच्या गटात रित्सा कोंडकर या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात बिगरमानांकित पुण्याच्या नील केळकर याने अव्वल मानांकित दिवीज पाटीलचा 6-2 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. पाचव्या मानांकित अयान शेट्टी याने तिसऱ्या मानांकित ओम वर्माचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या मानांकित द्रोण सुरेश याने सातव्या मानांकित आयुश पुजारीचा टायब्रेकमध्ये 6-5(5) असा पराभव केला.

मुलींच्या गटात रित्सा कोंडकर हिने अकराव्या मानांकित अनन्या दलालचा 6-0 असा पराभव केला. चौथ्या मानांकित प्रिशा शिंदे हिने पाचव्या मानांकित काव्या देशमुखचा 6-2 असा पराभव केला. दुसऱ्या मानांकित मेहक कपूरने सहाव्या मानांकित वरंदीका राजपूतवर टायब्रेकमध्ये 6-5(5) असा विजय मिळवला. तिसऱ्या मानांकित मृणाल शेळके हिने सातव्या  मानांकित ह्रितिका खपलेचा 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी: 10 वर्षाखालील मुली:
रित्सा कोंडकर वि.वि.अनन्या दलाल(11) 6-0;
प्रिशा शिंदे(4) वि.वि.काव्या देशमुख(5) 6-2;
मृणाल शेळके(3) वि.वि.ह्रितिका खपले(7) 6-3;
मेहक कपूर(2) वि.वि.वरंदीका राजपूत(6) 6-5(5);

10वर्षाखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
नील केळकर वि.वि.दिवीज पाटील(1) 6-2;
शौनक सुवर्णा(10) वि.वि.अथर्व येलभर 6-4;
अयान शेट्टी(5)वि.वि.ओम वर्मा(3) 6-4;
द्रोण सुरेश(2) वि.वि.आयुश पुजारी(7) 6-5(5).