टी20मध्ये केल्या २७० धावा, आयसीसी म्हणते तरीही हा विक्रम नाही

आयसीसीच्या आफ्रिका भागातील ट्वेंटी20 वर्ल्ड क्वालिफायरमध्ये 8 जुलैला केनिया विरुद्ध रवांडा संघात पार पडलेल्या सामन्यात केनियाने 123 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात केनियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात तब्बल 270 धावा केल्या. या ट्वेंटी20 क्रिकेटमधील सर्वाधिक धावा ठरल्या आहेत. मात्र तरीही ही धावसंख्या आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये विश्वविक्रम म्हणून नोंदवली जाणार नाही.

कारण सध्या आयसीसीचे टी20 क्रिकेटमध्ये फक्त 17 देश हे सदस्य आहेत आणि आयसीसीचे सदस्य असणाऱ्या संघाचेच सामने हे आंतरराष्ट्रीय सामने म्हणून गृहित धरले जातात.

आयसीसीने नुकत्याच केलेल्या नवीन नियमाप्रमाणे 104 देशांना टी20 क्रिकेटचे सदस्यत्व बहाल करण्यात येणार आहे.  पण हा नियम 1 जानेवारी 2019 पासुन लागू होईल. त्यामुळे याचा केनियाला फटका बसला आहे.

तसेच महिलांच्या क्रिकेटमध्ये या नियमाची अंबलबजावणी 1 जुलैपासुन सुरु करण्यात आली आहे.

सध्या टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि आॅस्ट्रेलियाच्या नावावर आहे. या दोन्ही संघांनी अनुक्रमे 2013 आणि 2016 ला 263 धावा केल्या आहेत. 

केनिया विरुद्ध रवांडा संघात पार पडलेला सामना रवांडामधील किगाली या शहरात पार पडला. या सामन्यात केनियाच्या चार फलंदाजांनी अर्धशतके केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

-हा देश म्हणतो, फिफा फायनलनंतर दुसऱ्या दिवशी सुट्टी जाहीर करा

-जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या भारताच्या युवा गोलंदाजाचे मास्टर ब्लास्टरकडून कौतुक

-एमएस धोनी म्हणतो, 300 एकदिवसीय सामने खेळलोय; मी वेडा आहे का?