केरला ब्लास्टर्स विरुद्ध मुंबई सिटी एफसी सामना १-१ असा बरोबरीत

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये केरला ब्लास्टर्स विरुद्ध मुंबई सिटी सामना १-१ असा बरोबरीत राहिला. हा सामना कोचीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होता.

केरला ब्लास्टर्स संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत पहिल्याच हाफमध्ये १ गोल केला. मार्क सिफोनेसने हा गोल केला होता. परंतु संघाला शेवटपर्यंत ही आघाडी कायम ठेवता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या हाफमध्ये मुंबई सिटीच्या बलवंत सिंघने १ गोल करून सामना १-१ अश्या बरोबरीने सोडविला.

केरला ब्लास्टर्स संघाचा पुढील सामना गोवा संघासोबत असणार आहे तर मुंबई सिटी संघाचा चेन्नैयीन संघासोबत असणार आहे.