फेडररला पराभूत करणारा खेळाडूला एबी डिव्हीलियर्सने केले होते टेनिसमध्ये पराभूत

विंबल्डन 2018मध्ये रॉजर फेडरर सारख्या दिग्गज टेनिसपटूला पराभूत करणाऱ्या केविन अँडरसनला दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेट कर्णधार एबी डेविलियर्सने एकदा पराभवाचा धक्का दिला आहे.

याबद्दल दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्याच असणाऱ्या अँडरसनने माहिती दिली. त्याने सांगितले की “एबी हा ज्यूनियर स्थरावर सुप्रसिद्ध टेनिस खेळाडू होता. मी त्याच्यापेक्षा 2 वर्ष ज्यूनियर आहे आणि आम्ही एकमेकांविरुद्ध खेळायचो.”

“मला अजूनही आठवते की एकदा त्याने मला सरळ सेटमध्ये पराभूत केले होते. पण मी त्याला चांगली टक्कर दिली होती. कोर्टचे कव्हरेज हा एबीच्या खेळण्यातील चांगला भाग होता. तो अफलातून बॅकहॅन्डचा शॉट खेळतो.”

डेविलियर्सनेही त्याच्या आत्मचरित्रामध्ये तो विविध खेळ खेळत असल्याचे सांगितले आहे.

अँडरसनने 11 जुलैला विंबल्डन 2018 मध्ये स्विझर्लंडच्या रॉजर फेडररला उपांत्यपूर्व फेरीत 4 तास 13 मिनिटापर्यंत रंगलेल्या सामन्यात 6-2,7-6,5-7,4-6,11-13 अशा पाच सेटमध्ये पराभूत केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

-भारतीय हौशी कबड्डी महासंघाचा(AKFI) सावळा गोंधळ

-प्रो कबड्डीच्या तारखा ठरल्या, जाणुन घ्या ६व्या हंगामाबद्दल सर्वकाही…

-६ विकेट्स घेणारा कुलदीप यादव म्हणतो हाच संघ जिंकणार फिफा विश्वचषक