…म्हणून ‘हिटमॅन’ रोहितने आपल्या बॅटवर लावले गेंड्याचे चित्र

मुंबई | मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या बॅटची सध्या चांगलीच चर्चा आहे, कारण त्याने त्याच्या बॅटवर चक्क गेंड्याचं स्टिकर लावले आहे.

इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसनने रोहितच्या या बॅटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. याचा अर्थही त्याने उलगडून सांगितला आहे. 

हा गेंडा म्हणजे SORAIचा लोगो आहे. SORAI म्हणजे ‘सेव्ह अवर राइनो आफ्रिका इंडिया’ असा आहे. पीटरसननेच ही मोहिम सुरु केली असून रोहितने त्याला पाठिंबा दिला आहे. 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईतील वानखेडे स्टेडीयमवर हा सामना झाला. 

मुंबईचा पुढचा सामना हैद्राबाद संघासोबत हैद्राबाद येथेच होणार आहे.