कसोटी क्रिकेटसाठी केविन पीटरसनची जोरदार फटकेबाजी

बेंगलोर | बुधवार दि. 12 जून रोजी झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार वितरण कार्यक्रमाबरोबरच सहावे मंन्सूर अली खान पतौडी स्मृती व्याख्यान पार पडले. या स्मृती व्याख्यानात प्रमुख व्याख्याता म्हणुन इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन उपस्थित होता.

त्याने या व्याख्यानात टी-20 आणि कसोटी क्रिकेटविषयी विविध मते व्यक्त केली. तसेच अती टी-20 मुळे कसोटी क्रिकेटवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचेही मत त्याने व्यक्त केले. कसोटी क्रिकेट खेळण्याचे प्रमाण आणि लोकप्रियता वाढवण्यासाठी त्याने विविध उपायही सुचवले.

“आपल्याला जर कसोटी क्रिकेट वाढवायचे असेल तर त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. तसेच दिवस-रात्र कसोटी सामने जास्तीत जास्त खेळवले पाहिजेत. त्याचबरोबर खेळाडूंना समान वेतन दिले पाहिजे. तसेच खेळाडूंनी सुद्धा मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी कसोटी क्रिकेटचा त्याग करू नये. कारण कसोटी क्रिकेटमध्ये जी मजा आहे ती मर्यादित षटकांच्या सामन्यात नाही.” असे परखड मत त्याने व्यक्त केले.

मंन्सूर अली खान पतौडी स्मृती व्याख्यानात व्याख्यांन देणारा केविन पीटरसन हा पहिलाच परदेशी क्रिकेटपटू आहे. यापूर्वी सुनिल गावस्कर, व्ही.व्ही.एस लक्षमण, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, फारूक इंजीनीअर यांनी मंन्सूर अलि खान पतौडी स्मृती व्याख्यानात व्याख्यान दिले आहे.

महत्वाच्या बातम्या:

गौतम गंभीरने आजपर्यंत एवढा ‘गंभीर’ आरोप कधीच केला नसेल!

यो यो फिटनेस टेस्ट म्हणजे काय रे भाऊ?

भारतीय गोलंदाजामुळेच भारतीय संघ येणार कसोटी सामन्यात अडचणीत!