ते सेलिब्रेशन २० वर्षीय खलील अहमदला पडले महागात

मुंबईत झालेल्या चौथ्या वनडे सामन्यात भारताने विंडीजवर 224 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर भारताचा गोलंदाज खलील अहमदला आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ताकिद दिली आहे.

खलीलने या सामन्यात 13 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यावेळी त्याने विंडीजचा फलंदाज मार्लोन सॅम्यूएल्स(18) बाद केल्यावर डिवचल्यामुळे आयसीसीने खेळांडूसाठी ठरवलेल्या लेव्हल 1 चे उल्लंघन केले.  यामुळे त्याला आयसीसीने 1 डिमेरीट अंक दिला.

खलीलने सामन्याच्या 14व्या षटकात सॅम्यूएल्सला बाद केले. सॅम्यूएल्स पवेलियनमध्ये परतत असताना खलील त्याच्यावर ओरडत होता. असे करताना त्याने आयसीसीच्या 2.5 नियमाचे उल्लंघन केले. हा नियम ‘भाषा, आक्रमक भावना याचा वापर करून समोरच्याला व्यक्तीला चिडवणे’ यासाठी आहे.

आयसीसीचे सामना रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी खलीलवर हे आरोप लावले. तर या सामन्यातील मैदानावरील पंच इयान गोल्ड, अनिल चौधरी, थर्ड अंपायर पॉल विल्सन आणि चौथे पंच सी शमसुद्दीन यांनी खलील वरील आरोप बरोबर असल्याचे मान्य केले.

खलीलले हे आरोप मान्य केल्याने या प्रकरणाची पुढची कारवाई करण्याची गरज नाही.

पाच सामन्याच्या वनडे मालिकेत भारत 2-1 असा आघाडीवर आहे. तर पुढील पाचवा आणि शेवटचा सामना 1 नोव्हेंबरला तिरूअनंतरपुरम येथे होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अपने धोनी को भूले तो नहीं

विराट म्हणतो, विश्वचषकासाठी धोनी नाही तर या खेळाडूची जागा संघात पक्की